भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन (sameerkunawar)

0
107

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- शहराच्या हृदयस्थानी उभा असलेला विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अधिक भव्य, आकर्षक आणि देखणे व्हावा, तसेच परिसराचा सर्वांगीण विकास घडावा, यासाठी जिल्हा वार्षिक योजना (नाविन्यपूर्ण योजना) २०२४-२५ अंतर्गत १ कोटी रुपयांच्या निधीतून सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन शुभारंभ आमदार समीर कुणावार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या उपक्रमासाठी आमदार समीर कुणावार यांनी स्वतः पुढाकार घेत जिल्हाधिकारी वर्धा यांच्याशी बैठक घेऊन नागपूर येथील VNIT संस्थेच्या तज्ज्ञ पथकाची पाहणी आयोजित केली. या पाहणी अहवालात पुतळ्याच्या तातडीच्या दुरुस्तीची शिफारस करण्यात आली.

वना नदीतून अवैध रेती उपसा वर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक.(hingnghat)

त्यानंतर आमदार कुणावार यांनी माजी पालकमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने प्रस्ताव शासनाकडे सादर केला आणि निधी मंजुरीसाठी प्रभावी पाठपुरावा केला. शासनस्तरावर मंजुरी मिळवून हा प्रस्ताव यशस्वीरीत्या मार्गी लावण्यात आला.

यानंतर नवीन DPDC समितीच्या बैठकीत विद्यमान पालकमंत्री मा. पंकज भोयर यांनी या विकासकामाला गती देत निधीच्या अंमलबजावणीत सकारात्मक भूमिका बजावली. त्यांच्या सहकार्याबद्दल आमदार कुणावार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.sameerkunawar

या भूमिपूजन कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, हिंगणघाट यांच्यावतीने आमदार कुणावार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सांस्कृतिक रंगत वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध ‘जाधव सिस्टर्स’ – विनया, विजया, वैभव जाधव आणि त्यांच्या संगीतमय संचाने “भीमगीतांचा सुफी नजराणा” सादर केला, ज्यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला.

sameerkunawar:या भव्य कार्यक्रमाला हिंगणघाट नगरपालिकेचे मुख्याधिकारी, विविध शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here