Sharadpawar/प्रहार विद्यार्थी संघटनेचे माजी जिल्हाप्रमुख अंकित दांडेकर यांच्यासह बुलंद आवाज ग्रुपचे अध्यक्ष पंकज विहिरकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश.

0
207

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट:- प्रहार विद्यार्थी संघटचे माजी जिल्हाप्रमुख अंकित दांडेकर यांच्यासह, बुलंद आवाज ग्रुप मांडगावचे अध्यक्ष पंकज विहिरकर यांचा सह इतर युवकांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश म्हणजे बदलाची नांदी आहे. जोमाने काम करीत नवनिर्माण घडवायचे असून सर्वसामान्य जनतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविला.

यावेळी प्रहार विद्यार्थी संघटनेचे माजी जिल्हाप्रमुख अंकित दांडेकर, बुलंद आवाज ग्रुपचे अध्यक्ष पंकज विहिरकर, सदस्य विक्रम पिसे, मंगेश खापरे, नितीन तडस, राहुल घुसे, रोशन तडस, उल्हास पादाडे,गौरव डांगरी, नितेश सुरजूसे, प्रणय कुंभलकर, अनिकेत ढवळे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश केला.सर्वाना प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेला घालून पक्षात स्वागत केले.

Sharadpawar/व पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, राजू मुडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here