शेतकर्यांच्या विविध मागण्या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरद पवार)गटा कडुन तहसील कार्यालय लोणारला निवेदन ( sharadpawar)

0
3

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

sharadpawar:लोणार तालुक्यातील शेतकर्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबीत असुन तत्काळ मंजूर करण्यात यावे,शेतकर्यांना न्याय देण्यात यावे,शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी,सन 2023-24 मधील खरिप व रब्बी पिक विमा धारकांचे प्रकरणे निकाली काढुन सरसकट विम्याचा लाभ त्वरीत देण्यात यावे.

,जलजीवन योजनेचे रखडलेली कामे त्वरीत पुर्णत्वास नेऊन योजना त्वरीत कार्यान्वीत करण्यास संभधीतांना तात्काळ आदेशीत करावे,तालुक्यातील शेत रास्ते, पांदण रस्ते,व मुख्यरस्त्याला जोडणारे ग्रामीण मार्गाची दुरावस्था झालेली असुन त्या रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करण्यात यावे.

बदलापुर मध्ये झालेल्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून संबंधीत शाळेच्या प्रशासनावर सुध्दा कडक कारवाई करण्यात यावी, लोणार तालुक्यात आधार कार्ड सेंटर वर नागरी सुविधा केंद्रची संख्या वाढवुन नागरीकांना वेळेवर दाले व इतर सुविधा मिळण्याबाबत कार्यवाही व्हावी,

जिल्ह्यातील पहिली भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा स्थापन ( buldhananews )

लोणार शहरातील बस स्टॅन्डचे काम बर्याच दिवसापासुन प्रलंबीत आहे.त्यिमुळे प्रविशांची वाताहात होत आहे.
तरी सदर बस स्टॅन्डचे काम त्वरीत पुर्ण करण्याबाबत संबंधीत कंत्राटदारला आदेश ध्यावे व कामात दिरंगीई करणार्या कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्यात यावे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या मागण्या त्वरित पुर्ण करण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने तहसील कार्यालया समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल त्याला पुर्ण पणे प्रशासन जवाबदार राहील.

sharadpawar:असे निवेदन देऊन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रेखा ताई खेडेकर, कार्याध्यक्ष नरेश शेळके राष्ट्रवादी नेते साहेबराव सरदार व लोणार तालुक्या तील कार्यकरते तहसील कार्यालयाला निवेदन देतांना उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here