१० नोव्हेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत — वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचे आवाहन
प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने हिंगणघाट येथे भव्य आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले होते.atulvandile
बैठकीस प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ नेते सुनिल राऊत, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, सहकार नेते वासुदेव गौळकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, सुधाकर खेडकर, विनोद वानखेडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, जिल्हा सचिव श्रीकांत भगत, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे आदी मान्यवरांची होती.
या वेळी जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी उमेदवारीसाठी इच्छुकांनी १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पूर्णतः सज्ज आहे. आगामी निवडणुकांत गावपातळीपासून जनतेचा विश्वास संपादन करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एक सक्षम पर्याय ठरेल. युवक व महिलांचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत बूथस्तरीय संघटन रचना, मतदार नोंदणी, जनसंपर्क अभियान आणि स्थानिक प्रश्नांवरील पक्षाची भूमिका यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बोरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत घवघवे यांनी मानले.
Sharadpawar /या प्रसंगी हिंगणघाट तालुका अध्यक्ष मिलिंद कोपुलवार, शहराध्यक्ष बालू वानखेडे, सिंदी रेल्वे शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, समाजसेवक सुनिल डोंगरे, माजी गटनेता आशिष देवतळे, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी, महिला आघाडी, युवक सेलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






