Shegaon / स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी मंगेश देशमुख

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव – स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या शेगाव शहर अध्यक्षपदी मंगेश देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
दर्पण नागरी सहकारी पतसंस्था कार्यालयात आज ( ता.१०) स्वस्त धान्य दुकानदारांची भगवंत पूरी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपुर्ण बैठक झाली.

या बैठकीत मंगेश लक्ष्मणराव देशमुख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून विजय नामदास व बाबुराव वानखेडे कायम राहणार आहेत. जिल्हा कार्यकारिणीत प्रतिनिधी म्हणून माजी शहर अध्यक्ष विनोद लांजुळकर यांचे नाव पाठिवण्याचे ठरले.

बैठकीला मोहन धनोकार, रवींद्र ढगे, निलेश गणेश, रोहित धराशिवकर, गोपाल पल्हाडे, रा. ज्ञा. बुरुंगले , श्रावण बहुउद्देशीय दीपक दादा धमाळ जय अंबिका माता स्वस्त अन्य दुकान शेगाव उन्नती बेरोजगार बहुउद्देशीय स्वस्त धान्य दुकान शेगाव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.shegaon

Leave a Comment