जळगांव जामोद ठाणेदार यांना सकल धनगर समाजाचे निवेदन

0
161

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात चराई बंदी करणेबाबत
बुलढाणा जिल्ह्यातील सह्या करणार समस्त धनगर समाज बांधव विनंतीपूर्वक निवेदन देतो की आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक मेंढपाळ असून बुरहानपुर मध्य प्रदेश मधून येणारे मेंढपाळ मेंढी चारण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये येतात व ईथला चारा संपूर्ण उद्ध्वस्त करून समोर निघून जातात त्यामुळे आम्हा स्थानिक मेंढपाळांना चराईसाठी वन वन भटकावे लागत आहे

यासह परंप्रातातून येणाऱ्या मेंढपाळांच्या जनावरांच्या पासून विविध रोगाची लागन सुद्धा होत आहे सध्या हिवाळा व पुढे उन्हाळा असल्याने आम्हास मेंढ्यांसाठी चराई जमीन उपलब्ध असणे आवश्यक आहे परंतु परप्रांतीतून येणारे मेंढपाळामुळे आमच्या जनावरांना कोणतेही चराईक्षेत्र शिल्लक राहत नाही परिणामी जनावरांचे उपासमारी होऊन कित्येकदा शेकडो जनावरे दगावत आहे.

त्यामुळे येत्या दहा दिवसात प्रशासनाने या परंप्रातीय मेंढपाळांना आपल्या हद्दीतील काढून द्यावे अन्यथा आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मेंढपाळ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू त्यानंतर होणाऱ्या परिणामास शासन व प्रशासन हेच एकमेव जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन जळगाव जामोद पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले

असून निवेदनावर सुभाष मस्के नंदू भाऊ लवगे शिवदास सोनोने सोनाजी डोमाळे गंगाराम कोकरे राजू कोकरे नाना कोकरे
भाऊराव मांगोजी खरात राजू मल्हारी डोमाळे श्याम राजिराम कोकरे महादेव खरात बंसी डोमाळे सोनाजी डोमाळे गजानन डोमाळे सोनाजी मदने गंगाराम डोमाळे बाळकृष्ण खरात राजू डोमाळे तानाजी मोरे अंबर डोमाळे बंडू झिंटे बोंहर कारंडे हनुमान डोमाळे तानू मारकळ महादेव पोकळे सदाशिव डोमाळ यांच्या सह बहुसंख्येने घनगर समाज बांधव उपस्थित होते news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here