बुलढाणा जिल्हाप्रतिनिधी इस्माईल
सविस्तर असे कि शेगाव तालुक्यातील ग्राम लासुरा बुद्रुक येथे हनुमान मंदिराचे नूतनीकरणाचे काम चालू होते, ते काम गावकऱ्याच्या सात संयोगाने संपूर्ण पूर्ण झाले असून त्या मंदिरामध्ये मूर्ती स्थापना कलश 21 डिसेंबर रोजी स्थापन करण्यात आले त्यानिमित्त मंदिर प्रशासनाने अखंड हरिनाम सप्ताह चालू केला आहे,
तरी विशेष असे कि, या कार्यक्रमांमध्ये महिला व तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन उत्साहात एकरूप झालेला गावकऱ्यांना दिसून येत असल्यामुळे संपूर्ण गावांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे,
असेच जर प्रत्येक गावातील तरुण वर्गाने इतर गोष्टीकडे लक्ष न देता अध्यात्माकडे जर पाऊल टाकले तर निश्चितच प्रत्येक गावामध्ये संताच्या अपेक्षा प्रमाणे भविष्यामध्ये सुजन शील समाज निर्माण होईल, यात काही शंका नाही.
Fraud Loan Apps :- फेसबूक, इन्स्टाग्राम, गूगलला दणका;मोदी सरकारचा “सात दिवसांच्या नंतर.
या कथेचे वाचक हरिभक्त परायण श्री शिवाजी महाराज मानकर यांच्या अमृततुल्य वाणीतून चालू आहे, ही कथा श्रवणासाठी पंचक्रोशीतील नागरिक व महिला बहुसंख्येने उपस्थित राहुन कथा श्रावणाचा आस्वाद घेतात.
या कथेची सांगता 28 डिसेंबरला होत आहे. अशी माहिती मारुती संस्थानचे विश्वस्त मंडळांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.
Shegaon News लासुरा गाव डुबले भक्ती सागरात,औचित्य मारुती मंदिरामध्ये मूर्ती स्थापनेचे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थांचे विश्वस्त मंडळ व गावकरी परिश्रम घेत आहेत.