Shegaon News |  रौप्य महोत्सवा निमित्ताने बुरुंगले विद्यालयात निबंध स्पर्धा संपन्न शेगाव तालुका पत्रकार संघाचा उपक्रम

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

Shegaon News शेगाव . दि ११, शेगावातील पत्रकारांच्या रोप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्नित शेगाव तालुका पत्रकार संघाकडून महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यामध्ये आज बुधवारी शेगाव येथील श्री.मस्कुजी बिरुजी बुरुंगले विद्यालय आणि श्री.ज्ञानेश्वर मस्कुजी बुरूंगले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात वाढत्या डिजिटल जगात मुद्रित पत्रकारितेचे भविष्य, पत्रकारितेत सोशल मीडियाची भूमिका, आणि डिजिटल पत्रकारितेचा इतिहास या विषयांवर दोन गटांमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद ३०० विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. विद्यालयाच्या प्राचार्य सौ. मीनाक्षीताई बुरुंगले, पर्यवेक्षक एस.एम. निळे, प्रा.एस.एस. मांडवे, एम.डी. कडाळे, एस.डी चोपडे, ए.जी. क्षीरसागर यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेत.

Maharashtra Rain: या राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये होणार पावसाचा येलो अलर्ट; परंतु काही भागात उद्याही पावसाचा अंदाज

मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय संघटक राजेश चौधरी, शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष फहीम देशमुख, सचिव नंदूभाऊ कुलकर्णी,माजी अध्यक्ष धनराज ससाने, संजय ठाकूर, राजकुमार व्यास,ज्ञानेश्वर ताकोते,प्रशांत खत्री इस्माईल शेख,

Shegaon news: नारायण दाभाडे , विशाल आसोलकर, गोपाल हिंगणे यांच्या निरीक्षणात ही परीक्षा संपन्न झाली. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या कार्यक्रमामध्ये सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष फहीम देशमुख यांनी दिली.

Leave a Comment