इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव दि. २३ प्रतिनिधी
जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय गजानन श्री गजाननचा गजर करत संत नगरी शेगाव येथे लाखाहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत आज २३ नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशीचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी एक लाखाहून अधिक भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
कार्तिक एकादशी निमित्त आज श्रीच्या पालखीची मंदिर परिक्रमा काढण्यात आली. यावेळी भाविकांनी श्रीच्या रजत मुखवट्याचे मनोभावे दर्शन घेतले. या उत्सवामुळे शेगावात पंढरीच अवतरल्याचे चित्र दिसत होते.
दरवर्षी कार्तिक एकादशीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपुरात जातात. परंतु काही कारणामुळे पंढरपूरला जावू न शकणारे भाविक या दिवशी विदर्भातील पंढरी असलेल्या शेगावात दाखल होवून श्री चरणी नतमस्तक होतात.
दरम्यान, आज सकाळ ४ वाजता पासूनच श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. कार्तिक एकादशी निमित्त आज ५ वाजता टाळ, मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात श्रीची पालखी मंदिर परिक्रमेसाठी मार्गस्थ झाली., टाळकरी, पताका धारी वारकऱ्यांचा सहभाग पालखी सोवत होता. तत्पूर्वी संस्थानच्यावतीने श्रींच्या रजत मुखवट्याचे ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात पारंपारीक पध्दतीने पुजन केले.
त्यानंतर श्री विठ्ठलाच्या तैल चित्राचे पूजन करण्यात आले. व भाविकांनी दर्शन घेतले. पालखी सायंकाळी मंदिरात दाखल झाली. यानंतर श्रींच्या पालखीची आरती करण्यात आली. श्रींच्या समाधी मंदिर दर्शनासाठी ३ तास लागत होते तर श्रींच्या मुख्यदर्शनासाठी ३० मिनिटे लागत होते. श्रींचे दर्शन झाल्यावर राज्यातील भाविकांनी महाप्रसाद घेऊन धन्य झाले.
https://www.suryamarathinews.com/crimenews-4/
भाविकांना फराळाचे वाटप.स्वंयसेवी संस्थांच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप शहरातील काही स्वंयसेवी संस्थांच्या वतीने बाहेर गावावरून येणाऱ्या भक्तांना फराळ, चहा, केळी व पाण्याचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यामुळे शहरात सर्वत्र भाविकांची मांदियाळी दिसून येत होती
श्रींच्या मंदिरात ६० हजाराच्या वर भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ९ वाजेदरम्यान एकादशीनिमित्त भक्तांना साबुदाणा उसळ, आमटी, भगर, केळी, नायलॉन चिवडा वाटप करण्यात आला. यावेळी जवळपास ६० हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. ShegaonNews