खासदार रामदास तडस याच्या हस्ते कबड्डी मॅट चे उदघाटन

 

स्थानिक खासदार निधीतून दिली कबड्डी मॅट

सिंदी(रेल्वे)- स्थानिक कबड्डी खेळाडूची मागणी लक्षात घेता व आधुनिक कबड्डी खेळण्याकरिता आपल्या स्थानिक खासदार निधीतून दिलेल्या कबड्डी मॅट चे उदघाटन रामदास तडस याच्या हस्ते आज पार पडले.

याप्रसंगी खासदार तडस यांनी बोलताना सांगितले की सिंदी करिता अनेक विकास कामे या मागील दहा वर्षात करण्यात आली आहेत या ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल मंजुरी असो किंवा लॉजीस्टिक पार्क असो त्याच प्रमाणे सिंदी सेलडोह कांढळी हा राष्ट्रीय मार्ग असो या व्यतिरिक्त सिंदी च्या विकासासाठी सात हायमास्क, एक ओपन जिम आणि आता कबड्डी मॅट आदी विकास कामे केलेली आहे.

सध्या देशात कबड्डी ही मॅट वर खेळल्या जात असल्याने व सिंदी हे कबड्डीचे माहेर घर असल्यामुळे येथील कबड्डी खेळाडूची मागणी लक्षात घेत कबड्डी मॅट देऊन विदर्भस्तरीय मॅट वरील कबड्डी सामने आयोजित केल्यास त्या करिता संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन तडस यांनी यावेळी दिले या सर्व विकासाचा पाठ पूरावा अमोल सोनटके यानी केले.

उदघाटन कार्यक्रमा प्रसंगी नवयुवक क्लब चे अध्यक्ष अशोकबाबू कलोडे सचिव सुधाकर खेडकर, साई स्पोर्टींग क्लब चे अध्यक्ष गंगाधर कलोडे, आशिष देवतळे ,सुधाकर घवघवे ,विद्या निकेतन संस्थाचे सचिव संजय भन्साली, स्नेहल कलोडे दत्ता कोपरकर प्रवीण सिरसिकर आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे संचालन अमोल सोनटक्के तर आभार प्रदर्शन राहुल कलोडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी गौरव कलोडे, रामेश्वर घंगारे, रामभाऊ सोनटक्के, मोहम्मद इमरान, धनराज झिलपे, धर्मेंद्र झाडे, सागर अंभोरे गुल्लू भन्साली चंदन चव्हाण आदीनी प्रयत्न केले

Leave a Comment