शेगाव रेल्वे स्थानकावर मारवाडी युवा मंचच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी लावण्यात आलेल्या शुद्ध व आरोचे जल कुंभाचे माजी मंत्री रमेश बंग यांच्या हस्ते लोकार्पण..( shegaonnews )

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: मध्य रेल्वेच्या मुंबई कलकत्ता लोहमार्गावरील भुसावळ रेल्वे डिव्हिजन मध्ये ऐ दर्जा प्राप्त शेगाव रेल्वे स्थानकावर मारवाडी युवा मंच अकोला या सामाजिक संस्थेने प्रखर उन्हामध्ये रेल्वे प्रवाशांना थंड व शुद्ध आरूचे प्रियजल

उपलब्ध व्हावे यासाठी अमृतधारा या जल कुंभाचे लोकार्पण सोहळा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री रमेश बंग यांच्या हस्ते माजी मंत्री जयप्रकाश जी मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार 28 एप्रिल रोजी पार पडला.

मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निकेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शरद शेठ अग्रवाल शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक मोहन देशपांडे, एडवोकेट पुरुषोत्तम डांगरा, यांच्यासह इतर अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

इंस्टाग्रामवर ओळख, प्रेमाचा बनाव अन् लग्नाचे आमिष!३२ वर्षीय विवाहितेवर वारंवार अत्याचार ,गुन्हा दाखल ( whatsapp news )

यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना निकेश गुप्ता यांनी सांगितले की मारवाडी युवा मंच विशाखा अकोला आपल्या अमृतधारा या स्थायी प्रकल्पांतर्गत शेगाव सारख्या संतनगरी असलेल्या पवित्र भूमीच्या रेल्वे स्थानकावर श्रींच्या

दर्शनासाठी शेगाव रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या भाविकांना प्रखर उन्हामध्ये थंड व शुद्ध पेयजल मिळावे या उद्देशाने मारवाडी युवा मंच अकोला च्या सौजन्याने गुप्ता परिवार अकोला यांच्या वतीने स्वर्गीय विद्यादेवी भिकुलालजी गुप्ता यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेगाव रेल्वे स्टेशनवर अमृतधारा शितल जलश्री आरो फिल्टर वॉटर कुलर प्लांट लावण्यात आल्याची माहिती निकेश जी गुप्ता यांनी दिली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या कार्यक्रमाला माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री जयप्रकाश जी मंडळ यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अकोला येथील रोहित रूमता सुरज काबरा ,नमन खंडेलवाल, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार व्यास, शेगाव येथील मारवाडी युवा मंच चे विनोद शर्मा, एडवोकेट मनोज मल, सुरेश धूत, वरून नागपाल, मयूर मुना, विश्व हिंदू

shegaonnews:परिषदेचे शेगाव शहर प्रखंड प्रमुख विजयकुमार राठी शेगाव संघर्ष समितीचे सचिव विजयकुमार मिश्रा, यांच्यासह शेगाव रेल्वे स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Comment