इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव
बुलढाणा (काप्र)महाराष्ट्र राज्याची चौथी राज्यस्तरीय पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा कोल्हापूर येथे दिनांक 21 व 22 डिसेंबर 2024 रोजी पार पडल्या येथे संपुर्ण राज्यातून दिव्यांग खेळाडू या सपर्धेसाठी उपस्थित होते.
या मध्ये बुलढाणा जिल्ह्या च्या महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त २०२३ वर्ष च्या आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुराधा सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली 7 खेळाडू यांनी सहभाग घेतला त्यात बुलढाणा जिल्ह्याने भरघोस कामगिरी केली यात शुभम अवचार यांनी 2 सुवर्णपदक व 1 रोप्य पदक मिळवले , वैभव संबारे यांनी 2 रोप्य पदक , अलका चव्हाण यांनी 1 रोप्य व 2 कास्य पदक,किरण साळवे यांनी 2 कास्यपदक प्राप्त केले तसेच गणेश जाधव यांनी 1 कांस्य पदक मिळवले.
Shegaonnews :तर कृष्णा परिहार यांनी 2 कांस्यपदक मिळवले असे एकूण तेरा पदकांची कामगिरी बुलढाणा जिल्ह्याने 4 थ्या राज्यस्तरीय स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंनी करून दाखविली आहे ही बाब बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.
4थ्या राज्यस्तरीयपॅरा ऍथिलिटिक्स स्पर्धात बुलढाणा जिल्यह्याची अभिमानास्पद कामगिरी(Shegaonnews)
खेळाडूंची स्वागत पॅरा ऑलम्पिक असोसिएशन बुलढाणा तर्फे श्री गणेश जाधव सर व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त अनुराधा सोळंकी यांनी केले.अशीच कामगिरी पुढील काळातही हे खेळाडू करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यातूनच लवकरच खेळाडूची राष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात येणार आहे