पेसोडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवैधरित्या पुतळा बसविण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल(shivaji maharaj putala)

0
23

 

अनिलसिंग चव्हाण (संपादक )

shivaji maharaj putala:फेब्रुवारी २२ च्या दिवशी संग्रामपूर तालुक्यातील पेसोडा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथे ग्रामपंचायतच्या बस स्टँड चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा सोनेरी रंग असलेला अर्धकृती पुतळा अवैधरित्या बसविण्यात आल्याची माहिती समोर आली.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

ही घटना २१ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडल्याचा अंदाज आहे. महिला ग्रामपंचायत अधिकारी संध्या श्रीराम अंभोरे यांनी या प्रकरणात तामगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली.

  1. बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
पेसोडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवैधरित्या पुतळा बसविण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल(shivaji maharaj putala)

 

shivaji maharaj putala:महाराष्ट्र पुतळ्याच्या पवित्र भंग प्रतिबंध अधिनियम १९९७ अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलिस अधिकारी राजेंद्र पवार, पोलिस उपनिरीक्षक जीवन सोनवणे, अनिल सुशीर, गजानन गव्हांदे, संतोष साखरे, मनीष वानखडे, सेवानंद हिवराळे, संतोष मेहंगे, होमगार्ड कर्मचारी अरविंद उमाळे, अक्षय पांडे यांनी भेट दिली व अर्ध पुतळा झाकून ठेवला. ठाणेदार राजेंद्र पवार यांनी ग्रामस्थांना शांतता राखून कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून आवाहन केले आहे. पुढील तपास तामगाव पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here