इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
shweta mahale :चिखली,वादळी वारे, गारपीट, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान होते. मात्र, नियमांचे अडथळे उभारून पीक विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करते.
याची अनेक उदाहरणे चिखली तालुक्यात मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.
या सर्व प्रकरणांची आमदार श्वेता महाले पाटील हे चौकशी करणार असून दोषी ठरणाऱ्या एआयसी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांंविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा सक्त इशारा आमदार श्वेता महाले पाटील यांनी दिला.
याशिवाय पीक कर्ज प्रकरणी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांबाबत मवाळ भूमिका घ्यावी.
कागदपत्रांची पूर्तता सौजन्याने करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे असे निर्देशही आमदार श्वेता महाले पाटील यांनी दिले आहे
तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा सभेच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना दिले.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा खरीप हंगाम सुरू होत असून पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना सर्वतोपरी मदत व्हावी, कुठलीची अडचण भासू नये.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
व पेरणी व्यवस्थित पार पडावी यासाठी कृषी विभागातर्फे तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आमदार श्वेता महाले पाटील यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयाच्या सभागृहात झाली.
shweta mahale:जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सर्वश्री मनोजकुमार ढगे, प्रभारी तहसीलदार वैभव खाडे, साहाय्यक निबंधक सहकार राजेंद्र घोंगे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सवडतकर, नाबार्डचे अधिकारी रोहित गाडे, एआयसी पीक विमा कंपनीचे अधिकारी मयूर लोणकर यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे, अनमोल ढोरे, युवराज भुसारी व सर्व भाजपा चे कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.