प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :- दि. १८ ऑगस्ट २०२५ रोज सोमवारला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातर्फे नगरपरिषद हिंगणघाट येथील मा. मुख्याधिकारी यांना जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे,सतीश धोबे तसेच तालुकाप्रमुख मनीष देवडे व शहर प्रमुख चंद्रकांत भुते यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
सविस्तर अशे की, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ या दिवशी हिंगणघाट नगर परिषदेच्या नवीन इमारत बांधकाम तसेच अंतरिक साज-सजावट पूर्ण झाल्यामुळे त्याचा लोकार्पण सोहळा ठेवण्यात आला होता.
या सोहळा निमित्त कार्यक्रम पत्रिका विनीत म्हणून या नगरपरिषदचे मुख्य अधिकारी प्रशांत उरकुडे यांनी राज्य शिष्टाचारानुसार (प्रोटोकॉल) मा. खासदार यांचे नाव महाराष्ट्र सरकारच्या राज्यमंत्री यांच्यानंतर पाहिजे होते . परंतु या पत्रिकेत मा. आमदार समीर कुणावार यांचें नाव राज्यमंत्री नामदार डॉ.पंकज भोयर यांचे नंतर टाकण्यात आले.
PwdNews /टूनकी ते वसाडी रोडवरील पुलाच्या भिंतीचे निकृष्ट आणि धोकादायक दर्जाचे काम?
व मा. खासदार यांचे नाव विशेष उपस्थिती म्हणून अमर काळे यांना पत्रिकेत खाली दर्शविण्यात आले. तसेच बसविलेल्या कोणशीला वर प्रोटोकॉल वगळून नावे अधोरेखित करण्यात आले. महाविकासआघाडी चे घटक पक्ष म्हणून शिवसेना खासदार श्री. अमर काळे साहेब यांचा झालेला अपमान सहन कसा काय करणार ? त्यामुळे शिवसेना द्वारा मुख्याधिकारी यांना सात दिवसाच्या आत त्या कोणशीला बदलविण्या बाबत सूचना करण्यात आल्या.
अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने त्या इमारतीचा उद्घाटनाचा दगड फोडून त्या ठिकाणी दुसरा दगड बसविण्यात येईल असे सक्त ताकीद देण्यात आली.
तसेच हिंगणघाट शहरातील झाशी राणी चौक येथे डॉ. गमे हॉस्पिटल जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामपूर्ण करण्यासाठी जवळपास वीस दिवसापासून मोठा खड्डा खोदून ठेवलेला आहे.
त्या खड्ड्या मुळे वाहतुकीस व त्या परिसरातील राहणाऱ्या रहिवाशांना व डॉ. गमे यांच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना वहिवाट करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशाच प्रकारे शहरातील इतर भागात सुद्धा खड्डे खोदून असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.त्यासाठी वरील सर्व शिवसेनेचे पदाधिकाऱ्याच्या प्रमुख उपस्थितीत त्या ठिकाणी त्या खड्ड्यात झाडे लावून उन्हामध्ये बसून आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात त्या परिसरातील सन्माननीय नागरिक तथा शिवसैनिक उपस्थित होते .सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तर्फे अभियंता व ठेकेदार यांचा प्रतिनिधी त्या आंदोलन स्थळी येऊन सदर काम पंधरा दिवसात पूर्ण करून देऊ असे लेखी स्वरूपाचे आश्वासन दिल्या गेले .त्या अधिकाऱ्यांना व ठेकेदार यांना शिवसेनेचे पदाधिकाऱ्यामार्फत सक्त ताकीद देण्यात आली की, जर पंधरा दिवसाच्या आत काम पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने यापुढे आंदोलन करण्यात येईल.
Sivshena / सदर सर्व बाबीस प्रशासन म्हणून आपण जबाबदार आहे. आंदोलनाकरिता शिवसेना पक्षाचे उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने ,माजी नगरसेवक शंकर मोहमारे,भास्कर ठवरे, नंदू रेडलावर ,शंकर झाडे ,अनंता गलांडे ,नितीन वैद्य ,चंद्रशेखर भोयर, गजानन काटोले, शितल चौधरी ,शकील अहमद ,वसीम शेख ,पप्पू घवघवे, संजय पिंपळकर ,राहुल मोहितकर, रितिक मोघे, फिरोज पठाण, हिरामण आवारी, नरेंद्र गुलकरी,दिलीप चौधरी, दिनेश धोबे, सुभाष काटकर ,विलास चौधरी ,प्रशांत कांबळे,हेमंत भोयर, राजेश बोडे ,संजय अंभोरे संजय रहाटे,भजभुजेताई, किशोर इंगोले, प्रशांत सुपारे, भास्कर भिसे, प्रभाकर खडसे,प्रभाकर खडसे, हार्दिप काळे,प ,प्रभाकर खोडे ,विजय कोरडे, बलराज डेकाटे, गौरव गाडेकर,सांताराम मुरकुटे, प्रवीण राऊत ,पांडुरंग निखाडे, नारायण मोघे ,श्रावण मोरे, संजय मोरे,महादेव विताळे,निमेश भोयर, नरेश खाडे, अतुल रोहनकर, प्रशांत भोयर इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.