प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट (दि. २३ सप्टेंबर २०२५, मंगळवार):
हिंगणघाट शहरातील लोकमान्य टिळक चौक येथे शिवसेना (शिंदे गट) तर्फे आयोजित “भव्य सार्वजनिक व घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२५” चा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती गौरी-गणपती सजावटींची पाहणी करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते निवडण्यात आले. ही स्पर्धा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन, अमित गावंडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होते:
शिवसेना वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख राज दिक्षित, जिल्हाप्रमुख राजेश सराफ, बाळा शहागडकर, हिंगणघाट विधानसभा प्रमुख राजेश हिंगमिरे, तालुकाप्रमुख अमित गावंडे व इतर मान्यवर.
स्पर्धेचा निकाल:
घरगुती गणपती सजावट स्पर्धा:
प्रथम क्रमांक: कार्तिक दाते, द्वितीय क्रमांक: पिंटु सुरकार तृतीय क्रमांक: मानसी मुळे
सार्वजनिक गणेश मंडळ सजावट स्पर्धा:
प्रथम क्रमांक: बाहुबली गणेश मंडळ
, द्वितीय क्रमांक: न्यु राज गणेश मंडळ,तृतीय क्रमांक: कोष्टीपुरा गणेश मंडळ विजेत्यांना आकर्षक शिल्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले, तर सर्व सहभागी स्पर्धकांनाही प्रोत्साहनपर शिल्ड देण्यात आली.
Sivshenanews/कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लोकमान्य टिळक चौक मित्र परिवाराचे योगदान, ज्यांनी आयोजनात मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी भास्कर पेंदे, प्रसिद्ध कलावंत गणेश उपासे, लाठीकाठी प्रशिक्षक राहुल तालेवार व महेश सहारे यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.