प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :- दिनांक : १२ ऑक्टोबर २०२५, रविवार सावली (वाघ), हिंगणघाट तालुका
सावली (वाघ) सर्कल येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक माजी उद्योग राज्यमंत्री व माजी आमदार मा. अशोक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे, तालुका प्रमुख मनीष देवढे व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्याबाबत सखोल चर्चा झाली. पक्षाच्या सूचनेनुसार तालुका पातळीवर अशा आढावा बैठका घेतल्या जात असून, सावली (वाघ) सर्कल ही पहिली बैठक ठरली.
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या “८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण” या ब्रीदवाक्यानुसार काम करण्याचे आवाहन अशोक शिंदे यांनी केलं. शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, त्यांना शक्य त्या मदतीसाठी शिवसैनिकांनी पुढे यावे, असंही त्यांनी सांगितलं.
Sivshenanews /यावेळी वाघसावली व नरसाळा गावातील ५० हून अधिक युवकांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करत पक्षाला बळकटी दिली.
बैठकीस सर्कल प्रमुख निलेश मानकर, संजय रहाटे, घनश्याम येडे, गजानन सातारकर, करण जेणेकर, योगेश ठक, अशोक मुरकुटे आदी उपस्थित होते.