प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :- हिंगणघाट शहरात आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत.
शहरातील प्रमुख राजकीय पक्ष — भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच अपक्ष उमेदवार अशा अनेक पक्षांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन प्रमुख पक्षांत गटबाजी निर्माण झाल्याने मतविभाजन होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा फायदा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहरातील भाजप कार्यकर्त्यांची संघटनात्मक ताकद आणि विकासकामांवर आधारित प्रचार यामुळे पक्षाचा जनाधार मजबूत झाला आहे.
काँग्रेस आणि इतर पक्षांनी मात्र स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून मतदारांना आकर्षित करण्याची तयारी सुरू केली आहे.
Sivshenanews /राजकीय निरीक्षकांच्या मते, या वेळी हिंगणघाट शहरात बहुकोनी लढत होईल, परंतु विरोधकांची विभागलेली मते भाजपच्या बाजूने सत्ता झुकवू शकतात.आता अंतिम निकालच सांगेल की हिंगणघाटच्या मतदारांचा कौल कोणत्या पक्षाच्या बाजूने लागतो.








