संग्रामपूर (अनिलसिंग चव्हाण)ः- शिक्षण ,कवायती व विविध खेळ व्यायामाचे महत्त्व म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण असतात ते ह्या माध्यमातून उघड मिळून चालना मिळते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी विविध खेळ खेळून दररोज कवायत करावी आणि व्यायाम करावा.sangrampur
त्यामुळे शरीर तंदुरुस्त निरोगी राहून मन मन शांत रहाते. व अभ्यासात लक्ष लागते. त्यामुळे व्यायाम कवायत करणे आवश्यक असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शिक्षणाचा मुख्य हेतू असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तालुका स्तरीय देशभक्ती व सांघिक कवायत प्रसंगी केले आहे.
शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,प्रियता व देशभक्ती निर्माण व्हावी व निरोगी रहावे ह्या उद्देशाने तालुक्यातून पीएमश्री जि.प. हायस्कूल संग्रामपूर शाळेच्या वतीने भव्य प्रांगणात दि. २६ / जानेवारी प्रजासत्ताक दिनी सामूहिक कवायत व देशभक्तीपर गीतांचे आयोजन करण्यात आले होते.
ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रशांत पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी माधव पायघन ,प्र.गटशिक्षणाधिकारी तथा सहा.ग.वि.अ. दिपक टाले, तालुका शिक्षण गट समन्वयक मिलिंद सोनोने, नगराध्यक्ष सौ. उषाताई सोनोने, शाळा समिती अध्यक्ष पुरुषोत्तम मिटकरी, नगरसेविका सौ पंचफुलाबाई वानखडे, ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी ,भाऊ भोजने, प्रल्हाद सावतकार(जेष्ठ छायाचित्रकार), आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम दिपप्रज्वलन करण्यात येऊन जि.प,हायस्कुलचे वतीने सर्व प्रमुख अतिथींतीचे स्वागत करण्यात येवून प्र.मुख्याध्यापक योगेश कुकडे यांनी प्रास्तविकातून ह्या मुख्य कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व सांगितले. त्यानंतर पिएमश्री जि.प.हायस्कूल संग्रामपूरचे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून सामूहिक कवायत व लेझीम सह कार्यक्रम सादर केलेत. सदर कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टरित्या सादर केल्यामुळे अधिकारी व इतरांनी समाधान व्यक्त केले.
Prashantpatil/यावेळी सकाळी देशभक्तीपर भाषण केल्याबद्दल कु. पूजा राठोड ह्या विद्यार्थ्यांनीस तहसीलदार प्रशांत पाटील यांनी स्वतः रोख बक्षीस दिले. ह्या कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक, कलाशिक्षक व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतलेत. ह्या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी ,माजी नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक ,पालक व सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एस. एस. सुरतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राठोड सर यांनी केले.








