दि. 11 जून 2026 रोजी वकील संघ, जळगाव जामोद येथे सन 2026-27 या कालावधीसाठी वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदी अॅड. आर. पी. विश्वेकर, उपाध्यक्षपदी अॅड. एस. व्ही. खूपसे तसेच सचिवपदी अॅड. ए. बी. वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सदर निवड सभेच्या अध्यक्षस्थानी वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. माहेश्वरी होते. यावेळी अॅड. खिरोडकर, अॅड. जी. एस. गावंडे तसेच वकील संघाचे सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अॅड. रविभाऊ उंबरकर, अॅड. मुकुंदा टोंगलकर आणि अॅड. विनोद मुंडोकार यांनी केले.
सदर ठरावाचे अनुमोदक म्हणून अॅड. आर. एस. काकडे यांनी तर सूचक म्हणून अॅड. डी. बी. ईगळे यांनी काम पाहिले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
Jalgaonjamod /वकील संघाच्या प्रगतीसाठी व सदस्यांच्या हितासाठी नव्या कार्यकारिणीकडून उल्लेखनीय कार्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



