उमरगा : तालुक्यातील बलसूर येथील श्नी. छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी (दि.८) रोजी शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलेल्या प्रगती औसेकर व राणी भालेराव आणि मार्गदर्शक प्रा. परमेश्वर सूर्यवंशी , संघ व्यवस्थापक प्रा. एन.टी. तेलंग, विशाल पाटील यांचा बलसूर ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी प्राचार्य जे.एन.जाधव होते. यावेळी उपमुख्याध्यापक सतीश पटवारी, उपसरपंच अयुब पटेल, ग्रामपंचायत सदस्य पवन पाटील, सामाजिक कार्यकर्ते माधव नांगरे, प्रशांत शित्रे, क्रीडा शिक्षक एम.डी.काळे , सुधीर नांगरे, बलभीम निरगुडे, महादेव म्हात्रे , नागनाथ तेलंग आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रा . सूर्यवंशी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ध्येय ठरवून वाटचाल करावी.
कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी सकारात्मक पद्धतीने वाटचाल करणे आवश्यक असल्याचे सांगितले .औसेकर व भालेराव यांचेही भाषणे झाली . गणित दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.
Dharashivnews /सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख कवी संजय गायकवाड यांनी केले. तर आभार प्रा .बी .टी. जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








