ऋषिकेश सुरवसे
उमरगा : उमरगा शहरातील ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशनच्या वतीने (दि. ११) रोजी उमरगा-लोहारा परिसरातील महिलांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सिंदखेडराजाकडे रवाना करण्यात आले.
उमरगा-लोहारा तालुक्यातील सर्व जिजाऊंच्या लेकींना अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि पुस्तके अशी प्रेमाची शिदोरी ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशनकडून सिंदखेडराजाला निघालेल्या या सर्व जिजाऊंच्या लेकींना देण्यात आली.
यावेळी ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशनचे पदाधिकारी सत्यनारायण जाधव, ऍड. अर्चनाताई जाधव, शबाना उडचणे, धानय्या स्वामी, किशोर बसगुंडे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनींना सकाळी ठिक 6 वाजता उमरगा बसस्थानक येथे दिली.महिलांना बसमध्ये बसवून, सुखी व सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा देवून त्यांची पाठवणी केली.
Dharashivnews /सिंदखेड राजाच्या प्रवासासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या शिवमती रेखाताई पवार यांनी पुढाकार घेतला.








