बातमीदार ऋषिकेश सुरवसे
उमरगा : बालविकास प्राथमिक विद्यामंदिरात “संविधान दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.
तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद पोलीस अधिकारी व जवानांना अभिवादन करण्यात आले. शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आले.
Dharashivnews /यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता कावळे मॅडम शिक्षिका श्रद्धा पुजारी,मोनिका नदीवाडे,अश्विनी जोशी, शबाना मुल्ला,पल्लवी मुटले, शिक्षक अक्षय राठोड,आकाश कटकधोंड तसेच विद्यार्थी, पालक उपस्थित होते.








