सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा
Dharashivnews /उमरगा: तालुक्यातील भुसणी जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन संपन्न झाला.
प्रथमतः भुसणी केंद्राचे केंद्रप्रमुख लक्ष्मण बनसोडे आणि शाळेचे मु.अ.गोविंद सोमवंशी यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविकपर कु.आर्या हिरमुखे याने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितले.
शाळेतील उपक्रमशील शिक्षक अनिल जाधव, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी रोहित गायकवाड यांनी थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती सांगून प्रश्न मंजुषा हा उपक्रम घेतले.
इयत्ता पहिली ते सातवी सातवी वर्गातील निवडक विद्यार्थीनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ऊल्लेखनीय जीवन कार्याविषयी भाषण केले.
बालसभा उपक्रमातंर्गत इयत्ता सहावी वर्गाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष कु. समिक्षा बनसोडे, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.श्रद्धा गावडे आणि आभार प्रदर्शन कु.भुमिका पवार यांनी केले. बालसभा उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांना सहावी वर्गशिक्षक अनिल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
Umrganews /यावेळी शाळेचे मुख्याद्यापक गोविंद सोमवंशी,अनिल जाधव, संभाजी माळी,व्यंकट कांबळे, विजय धोत्रेकर,परमेश्वर साखरे, श्रीम.अनिता रांजणकर, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी रोहित गायकवाड आदि सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.








