Umrganews /नवीन आमदारांना लोक आमदार म्हणत नाहीत यात आमची चूक काय – माजी आमदार ज्ञानराज चौगुले

0
28

शिवसेना- काँग्रेस पक्षाचा वचन नामा जाहीर करत पत्रकार परिषद

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा /प्रतिनिधी – नवीन आमदारांना लोक आमदार म्हणत नाहीत अजूनही मलाच आमदार म्हणतात कारण आम्ही जनतेची तेवढी कामे केली आहेत. आम्ही स्वतःला आमदार म्हणू नका भाषणामध्ये सांगतो तरी लोक प्रेमाने आमदार म्हणतात.

नवीन आमदारांनी एक वर्षात किती निधी आणला व काय कामे केली हे जनतेला सांगावे. अशी टीका उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या उमरगा नगर परिषदेच्या सभेतील भाषणाचा समाचार घेताना माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केली.

शिवसेना, काँग्रेस लहुजी शक्ती सेना, रयत क्रांती व मित्रपक्ष शहर विकास पॅनलच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या “वचननामा” प्रकाशन व पत्रकार परिषदे दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार रवी गायकवाड, शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण गायकवाड, माजी कृषी सभापती जितेंद्र शिंदे, काँग्रेसचे विजय दळगडे, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनोरे, काँग्रेसचे तालुकाप्रमुख अर्जुन बिराजदार, नानाराव भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख बळीमामा सुरवसे, सुप्रिया घोडके, राहुल शिंदे, स्वाती स्वामी, सचिन जाधव , अश्विनी सोनकांबळे, धनंजय मुसांडे, यल्लमा विभूते, बशीर शेख, शबाना लदाफ, पंढरीनाथ कोणे, अनिल सूर्यवंशी, सुषमा पाचंगे, जानवी कोथिंबीर, ज्ञानेश्वर पाटील, विशाल कानेकर, फातिमा औवटी, विजय वाघमारे जमशादबी शेख, प्रिया पवार, मुस्तफा चौधरी, मुजावर फरहीन, बाबा मस्के, अभिजीत मोरे, रेखा सूर्यवंशी, आरती शिंदे आदी उपस्थित होते.

Umrganews /शिवसेना काँग्रेस व मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या शहर विकास पॅनलचा प्रचार फेरीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here