Umrganews /उमरगा तालुक्यात वेळा अमावस्या उत्साहात साजरी

0
28

भजी, बाजरी भाकरी, बाजरीचे उंडे, खीर, धपाटे, आंबील, आदी रानमेव्याचा घेतला आस्वाद
————–
सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा: निसर्गाचा दगाफटका कितीही बसो, पण काळ्याआईची मनोभावे पुजन करत बळीराजा, शेतकऱ्यांनी शेतातील उत्पन्न, समृद्धी व भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करून शुक्रवारी (दि.१९)रोजी वेळा अमावस्या (येळवस) उत्साहात साजरी केली.

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडलेले खरीप हंगामातील पिकाचे उत्पन्न जेमतेमच निघाले.जमिनीच्या ओलाव्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी उशिरा सुरू झाली परंतु पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेत शिवारातील पिके बहरलेली दिसून आले. खरिपामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असताना सुद्धा शेतकरी न डगमगता काळ्या आईच्या सेवेसाठी सज्ज झालेला दिसून येत आहे.dharashivnews

येळवस या सणानिमित्त शेत शिवारात हर हर बोलो रे भगत राजा हर हर बोला तसेच महादेवाचा जयघोष करत यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या नातेवाईकांसह मित्र परिवारासह आपल्या शेतात रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी निमंत्रित केले होते. यावेळी बाल गोपाळांसह महिला, पुरुष, मित्र मंडळांनी भजी, बाजरी भाकरी, बाजरीचे उंडे, खीर, धपाटे, शेंगदाण्याची पोळी, आंबील, आदी रानमेव्याचा आस्वाद घेतला. उमरगा शहरात सकाळपासूनच जिकडे तिकडे सणाला जाण्यासाठी प्रत्येकाची लगबग सुरू असल्याचे दिसून येत होते.

Umrganews /त्यामुळे शहरात दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत होता. अनेक व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे खेड्यातून येणाऱ्या ग्रामस्थांचा ओघ कमी असल्याने शहरातील अनेक रस्ते दुपारनंतर निर्मनुष्य दिसत होते.

Dharashivnews /सर्व शेत शिवार माणसाच्या वर्दळीने फुलून गेले होते. शेतकरी सकाळपासूनच आपल्या शेतात पांडवाची पूजा करण्यात मग्न असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे सर्वच शेत शिवार शेतकरी, नातेवाईक, मित्रपरिवारांनी गजबूज गेले होते. हा वेळा अमावस्या सण शेतकरी बांधवांनी उत्साहात साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here