श्री नरेंद्रचार्य महाराज उमरगा सत्संग सेवेचा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम
————
सूर्य मराठी न्यूज उमरगा
उमरगा : जगद्गुरु रामानंद संप्रदाय श्री नरेंद्रचार्य महाराज यांच्या सत्संग सेवा केंद्राच्या माध्यमातून उमरगा तालुक्यातील दाबका, तलमोड, चिटकोट, जहागीर चिंचोली, नागराळ, उमरगा शहर, येळी, सुंदरवाडी, धाकटेवाडी, मळगी, अशा विविध ठिकाणी उमरगा तालुक्यात एकूण १६ वनराई बंधारे बांधून जलसंधारण, आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या या संप्रदायाने महाराष्ट्रात एकूण असे पाच हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.dharashivnews
वनराई बंधारा सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांमध्ये माती, वाळू आणि दगड भरून नदी-ओढ्यांच्या पात्रात चौदा डिसेंबर ते वीस डिसेंबर या
दरम्यान हा कच्चा बंधारा बांधण्यात आला आहे.
या ठिकाणचे पाणी वाहून न जाता ते जमिनीत जिरावे व या ठिकाणचे सिंचन वाढावे या उद्देशाने हा बंधारा बांधण्यात आला आहे.umrganews
गेल्या महिण्यात या संप्रदायाने १ लाख १० हजार वृक्षारोपण ही केले आहे.
Dharashivnews /रक्तदाना मध्येही हा सांप्रदाय अग्रेसर असतो. पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी २०२६ मध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करुन १ लाख ५० हजार बॉटल रक्त संकलित करण्याचे उद्धीष्ट असल्याचे या संप्रदायाने सांगितले आहे.
वनराई बंधारा बांधण्यासाठी गुरुभगिनी, गुरुबंधू, यांनी श्रमदान केले.








