उमरगा प्रतिनिधी ऋषिकेश सुरवसे उमरगा
उमरगा : तालुक्यातील कदेर येथील ग्रामपंचायत कार्यालया समोरील गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग उपोषण अखेर दि 29 रोजी सायंकाळी 6:00 तिसऱ्या दिवशी उशिरा संध्याकाळी मागे घेण्यात आले. करण्यात आलेल्या १० मागण्यांपैकी सर्व मागण्या पुढील १५ दिवसांच्या आत टप्प्याटप्याने पूर्ण करण्यात येतील,
असे आश्वासन उमरगा–लोहारा मतदारसंघाचे आमदार मा. प्रवीण स्वामी (गुरुजी) यांनी दिले. वैशाली जाधव यांचे वडील आणि आमदार साहेब यांच्या हस्ते पेय( लिंबू पाणी इ.)घेऊन थांबवण्यात आले.
प्रशासनावर आज विश्वास ठेवणे कठीण झाले आहे; पण आमदार साहेब हे गुरू असल्याने त्यांचा शब्द नक्कीच खरा ठरेल,” असा विश्वास उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला.
या वेळी तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते;
तथापि आमदार साहेब हे पूर्वी शिक्षक असल्याने त्यांना ‘गुरू’ म्हणून मानले जाते. गुरूंचा शब्द ओलांडता येत नाही, अशी श्रद्धा असल्याने त्यांच्या लेखी आश्वासनावर पूर्ण विश्वास ठेवून उपोषण सोडण्यात आले.
यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी ग्रामपंचायतीने योग्य जागा दाखवल्यास स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार निधीतून महिलांसाठी विशेष करून बस स्थानक बांधून देण्याचे व व जिल्हा परिषद शाळेत संडास बाथरूम व इतर सुविधा आमदार देण्याचे आश्वासन देण्यात आले.
व इतर मागण्या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी पंधरा दिवसाच्या आत करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
सकाळी तालुक्याचे तहसीलदार गोविंद येरमे, नायब तहसीलदार बेलोरे, यांच्यासह पंचायत समिती विस्तार अधिकारी एस.एस.राऊत साहेब,व अजित भांगे साहेब व मंडळ अधिकारी जेवळीकर,प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉक्टर शिवानंद पाटील,कृषी सहाय्यक अतुल गायकवाड,तलाठी बागवान मॅडम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता घोडके,जि.प. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुरेश पाटील,बिडवे, मोरे ,साहेब यांच्यासह ग्राम विकास अधिकारी शिवानंद बिराजदार,सरपंच सतीश जाधव,उपसरपंच राणी राठोड, इतर लोकांनी भेटी दिले.
व आश्वासन स्थगित करण्याची विनंती केली त्यांच्या विनंतीला मान न देता त्यांनी सायंकाळी 6:00 वाजता स्थगित करण्यात आले.
यावेळी ग्रुप 07 च्या वतीने आमदार प्रवीण स्वामी यांना कदेर पार्टी ते कदेर रस्ता मंजुरी व दुरुस्ती करण्यात यावी याविषयीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना शाखाप्रमुख अजित गायकवाड,जिल्हा परिषद गण प्रमुख जनार्दन बिराजदार, डॉक्टर मनोहर गायकवाड,क्रांती कांबळे, दाजी पाटील,भास्कर माजी.सरपंच विश्वनाथ शिंदे, संजय कलशेट्टी, माजी सरपंच राजेंद्र सामाने यांच्यासह इतर गावातील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.







