बुलढाणा : लोकसभेच्या निवडणुकीत ‘अबकी बार चारसो पार’ च्या वल्गना करणाऱ्या महायुतीचे चौखूर उधळलेले खेचर दिल्ली समोर कधीच न झुकणाऱ्या महाराष्ट्राने रोखला. आताही सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने प्रज्वलित झालेल्या मशालच्या ज्वालानी गद्धारांचा कारभार भस्मसात करणार असल्याचे आग्रही प्रतिपादन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले आघाडी सत्तेत आली तर जिथून गद्धार आसाम कडे पळाले त्या सुरत शहरासह महाराष्ट्र राज्यात सर्वत्र छत्रपती शिवरायांची मंदिर उभारणार या घोषणेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या ( महाविकास आघाडीच्या) उमेदवार जयश्री सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी बुलढाण्यात आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जंगी सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. आज शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी पार पडलेल्या जाहीर सभेला आघाडीचे कार्यकर्ते, नागरिक, मतदार, शेतकरी यांची अलोट गर्दी उसळली.
अतुल वांदीले यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा, हिंगणघाट विधानसभेत वाजणार तुतारी!(sharadpawar )
यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आमदार मिलिंद नार्वेकर, बुलढाणा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या( आघाडीच्या) उमेदवार जयश्री सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष माजी आमदार रेखा खेडेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, छगन मेहेत्रे, लखन गाडेकर, साहेबराव सरदार, सुमित सरदार,काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, धृपदराव सावळे, गणेश पाटील,आमदार धीरज लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, रवी पाटील, ऍड विजय सावळे, रशीदखान जमादार, सुनील सपकाळ, सतीश मेहेंद्रे, रवी पाटील दत्ता काकस, शिवसेनेचे लखन गाडेकर, अशोक गव्हाणे, दत्तात्रय लहाने आदी उपस्थित होते.
नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा ठाकरेंचे सभास्थळ असलेली बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी समोरील मैदानात आगमन झाले.आपल्या भाषणाची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी ‘माझ्या महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, माता- भगिनींनो’ असे संबोधित करून केली. लोकसभेनंतर आज आपली विधानसभा निमित्त भेट होत असल्याचे सांगून त्यांनी उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाशी संवाद साधत भाषणाला सुरुवात केली. बुलढाणा लोकसभेत कमी मतांनी आघाडीचा पराभव झाला. हा पराभव मनाला चटका लावणारा ठरला.
यामुळे एक गद्धार वाचला असे खासदार प्रतापराव जाधव यांचा नामोल्लेख न करता ते म्हणाले. लोकसभेतील महा यशाने आघाडीचे मनोबल वाढले असल्याचे सांगून यामुळे विधानसभेत आघाडी जास्त एकजूट आणि एकदिलाने एकत्र आली आहे. व्यासपीठाव रील मित्रपक्षांच्या उपस्थिती ने हे सिद्ध झाले. लोकसभेत एक गद्धार कसाबसा वाचला पण बुलढाण्यातील गद्धार कसाच वाचत नाही हे आजच्या तोबा गर्दीने सिद्ध झाले आहे. राज्यात आघाडीचीच हवा नव्हे वादळ असून आघाडीचे सरकार सत्तेत येणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचा दावा ठाकरे यांनी बोलून दाखविला. आघाडीत शिवरायांचे खरे भक्त, मावळे आहेत तर ‘पलीकडे’ महाराष्ट्र द्रोही आहेत. भगवा मिळविणारा प्रत्येक जण मावळा असतोच असे नाही. चाळीस दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा घातला, भगवा, धनुष्य आणि पक्ष चोरला असा घणाघात त्यांनी यावेळी केला. युतीचे शिवरायावरचे प्रेम बेगडी आहे. त्यांना केवळ मते मागण्यासाठी शिवराय पाहिजे. शिवरायांचा जयजयकार ऐकला की देवेंद्र फडणवीस यांचा जळफळाट होतो. मालवण मध्ये कोसळलेल्या छत्रपतींच्या पुतळ्यासारखे यांचे शिवप्रेम पोकळ आहे.
भ्रष्टाचार करुन बांधण्यात आलेल्या या पुतळ्याचे अनावरण अशुभ हाताने झालं, मग तो सफल होणार तरी कसे असा टोला त्यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला. शिवरायांचा पराक्रमी महाराष्ट्र यांनी दोन नेत्यांच्या आणि गुजरातच्या चरणी अर्पण केल्याची जहाल टीका ठाकरेंनी यावेळी केली. त्यांच्या कचाट्यातून उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी देखील सुटले नाही.विदर्भात घेतलेल्या सभात योगी यांनी ‘बटेगे तो कटेगे’ ; एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ या विधानाचा त्यांनी समाचार घेतला.इथे सर्व जण गुणया गोविंदाने राहत आहे. त्यांच्या या घोषणाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच विरोध दर्शविला आहे.आम्हीं कसे राहावे हे बाहेरच्यांनी शिकवायची गरज नाही असे दादा म्हणाल्याची आठवण करून दिली.
खबरदार!गाठ माझ्याशी आहे
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ठाकरेंच्या भाषणापूर्वी जयश्री शेळके यांनी आक्रमक भाषण झाले.राज्यातील युतीच्या नेत्यां प्रमाणेच बुलढाण्याच्या आमदारानेही राज्याच्या संस्कृती धुळीला मिळविली आहे. नौटंकी, नाटक आणि ढोंग या तिनसूत्री वर वागणाऱ्या
आमदाराने न केलेल्या विकास कामाचा रिकामा ढोल बडविणे सुरू केले आहे. आत्ताच पराभवाच्या भीतीने पाया खालची वाळू घसरल्याने त्यांनी माझ्यावर, परिवारावर आरोप करणे सुरू केले आहे. मात्र याने मी डगमगणारी नाही. यामुळे नकली सेनेच्या नकली वाघाने मला भीती घालू नये, गाठ माझ्याशी आहे याचे भान ठेवून बोलावे असा इशारा शेळकेनी दिला. सूत्रसंचलन गजानन धांडे यांनी केले.
Vidhansabha :-‘ताईना तुम्ही आमदार करा,मी ‘भाऊ’ ला करतो’यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा मतदारसंघाच्या उमेदवारीचे गुपित व नाट्यमय घडामोडी उपस्थिताना सांगितले. लोकसभा नरेंद्र खेडेकर आणि विधानसभा जालिंदर बुधवत याना असे मी फार पूर्वी दोघां ना संगितले होते. अंतिम बैठकीत आपण बुधवत याना ‘थांबण्यास’ सांगितले असता त्यांनी एका क्षणात माघार घेतली.या निष्ठची मी कदर करणारच.तुम्ही जयश्रीताईना आमदार करा, जिल्हा प्रमुख बुधवत याना मी आमदार करेन असा शब्द त्यांनी बुलढाणे कराना दिला.




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



