आॅनलाईन तक्रार करतांना शेतकर्याना होतेय अडचन आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात आरडीसी यांना निवेदन( wardhanews )

 

ताबडतोब अडचन दुर करण्याची निवेदनाव्दारे मागणी

सिंदी रेल्वे ता.१२ : शेतीच्या नैसर्गिक नुकसानीची शासन नियमानुसार ७२ तासाच्या आत विमा कंपनीच्या आॅनलाईन संंकेतस्थळावर व टोल फ्री नंबर वर तक्रार नोंदवाला तांंत्रिक अडचन जात असल्याने

रविवारी (ता.११) झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले सेलु आणि समुद्रपूर तालुक्यातील अनेक शेतकर्याची मोठी गोची झाली आहे.

सदर विमा कंपनीचे संकेतस्थळ आणि टोलफ्री क्रमांक ताबडतोब सुरु करण्याबाबत योग्य ती कारवाई करावी तसेच परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी पीक वीमा काढला नाही.

 

कार्यक्रमात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी,कार्यकर्तानी खुर्च्यांची छत्री करीत पलायन, हजारो खुर्च्या गायब ( Wardha News )

त्याही नुकसान ग्रस्त शेतकर्याच्या शेतात जाऊन महसुल यंत्रनेच्या साहाय्याने पंचनामे करुन शासनस्तरावरुन तात्काळ मदत मिळवुन देण्याच्या मागणीचे निवेदन काग्रेसचे आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता.१२)परिसरातील शेतकऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी गणेश खरताडे यांना सादर केले.

 


विशेष म्हणजे झालेले वादळी पाऊस आणि गारपीट ऐवढे मोठे होते की यात परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील गहु हरभरा भाजीपाला आणि उन्हाळी सोयाबीन भुईसपाट झाले आहे.

wardhanews:सदर निवेदन देताना शेतकरी आशिष देवतळे, राजू दांडेकर, प्रदीप झाडे, वामनराव ढोक, राजू सोनटक्के,सुनील बोंबले, खुशाल बोरकर, शंकर झाडे, बालु साठोने, नरेश बानाईत आदी शेतकर्याची प्रमुख उपस्थीती होती

Leave a Comment