इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगांव . RPI: मा.दीपक निकाळजे, राष्ट्रीय अध्यक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) यांच्या आदेशानुसार आणि मा.मोहनलाल पाटील, राष्ट्रीय महासचिव,मा.बाळासाहेब पवार, कार्याध्यक्ष,पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोष इंगळे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या जिल्हास्तरीय तालुकास्तरीय पदाच्या नियुक्ती जील्हा अध्यक्ष तथा पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोष इंगळे यांच्या हस्ते पदनियुक्त देण्यात आल्या.
त्यामध्ये प्रामुख्याने महिला व पुरुष युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा माहा सचिव डॉ सचिन रावत,जिल्हा उपाअध्यक्ष राजेश वानखडे,जिल्हा कोषाअध्यक्ष सागर सिरसाट जिल्हा युवा अध्यक्ष प्रदिप तायडे,जिल्हा उपाअध्यक्ष संदीप शिदे, चिखली तालुका अध्यक्ष राजेश डोंगरदिवे,जळगाव (जा) तालुका अध्यक्ष प्रफुल्ल तायडे शेगाव तालुका अध्यक्ष अनिल इंगळे, खामगांव तालुका उपाअध्यक्ष कयुम खान, चिखली तालुका अध्यक्ष,शिध्दाथऺ जाधव,मलकापूर महिला आघाडी तालुका अध्यक्षा सुनिता तायडे,चिखली तालुका उपा अध्यक्ष सचिन अंभोरे,खामगांव महिला आघाडी तालुका उपाअध्यक्ष ज्योती सावदेकर, मलकापूर महिला आघाडी उपाअध्यक्ष सुमन तायडे,खामगांव तालुका सदस्य दयाराम डोंगरदिवे,खामगांव तालुका कार्याध्यक्ष बळीराम धुरंधर. इत्यादी पदाधिकाऱ्यांना पक्षांमध्ये समाविष्ट करत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
सामाजिक राजकारण बिघडले असता आपल्याला एकीकरण होण्याची गरज आहे.आपल्या आपल्यात भांडणे करून काही उपयोग नाही त्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागेल या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या नितीने चालण्याची आज गरज आहे.
असे आपले मनोगत जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोष इंगळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाची नियोजन जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर इंगळे यांनी केले. सर्वच राजकीय पक्ष विधानसभा लोकसभेच्या अनुषंगाने आपल्या पक्षाची बांधणी करत आहे. बांधणी करत असताना, पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित व कामाला लागले आहे.
आपणही आमच्या पक्षाची विधानसभा व लोकसभा लढवणार असून जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी जोडण्याची आवश्यकता आहे.
हे लक्षात घेऊन पद न घेता त्या पदाचा गरिमा आपल्याला जाणून घ्यावी.व पक्षाला गालबोट न लागता आपण काम करावे अशी इच्छा जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर इंगळे यांनी व्यक्त केली.
खऱ्या अर्थाने लोकांच्या समस्येकडे जातीने लक्ष घालून त्याला न्याय मिळेपर्यंत त्या गोष्टींचा पाठपुरावा करून न्याय देणे हे खरे कार्य समजले जाते.आपली सर्वानुमते जिल्हा कोषाध्यक्ष करीता नियुक्ती केलेली आहे.
त्याबद्दल मी वतिष्ठांचे आभार मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर हा पक्ष आहे. व त्यात मला काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे.
RPI :माझ्या सर्व समावेशक कार्याची ओळख महाराष्ट्रभर पक्षाच्या मार्फत एक नवी अवलौकिक छबी तयार झाली याची मला खात्री आहे. हाच पक्षाच्या वरिष्ठांचा विश्वास कायम ठेवून मी पदाची गरीमा राखत निष्ठेने व पक्षाच्या वैचारिक भावनेने माझे कार्य पार करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे.