यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
Yavalnews:तालुक्यातील मागील दोन महीन्यात मनवेल आणी डांमुर्णी या दोन ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन चिमूकल्या बालकांचा बळी गेला होता, या बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रूपयेप्रमाणे ५० लाख रूपयांचे धनादेश चोपडा यावल मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले .
यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात सेवा हक्क दिना निमित्त आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .
या तालुकास्तरिय आढावा बैठकीस यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार , यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ .मंजुश्री गायकवाड ( बोरसे ),पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विश्र्वनाथ धनके,यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी
जहॉंगीर तडवी यांच्यासह वनविभागाच्या पश्चीम क्षेत्राचे वनपाल विपुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मनवेल तालुका यावल येथे दिनांक ६ मार्च रोजी बिबट्याच्या हल्ल्यात केशव बारेला या ७ वर्षीय बालकाला आपला जिव गमवावे लागले होते तर डांभुर्णी तालुका यावल या गाव शिवारात दिनांक १५ एप्रील रोजी मेढपालन करणाऱ्या ठेलारी कुटुंबातील रत्नाबाई या २ वर्षीय लहान चिमकुलीचा बिबट्याने बळी घेतला.
Yavalnews:होता,दरम्यान या मरण पावलेल्या दोघा बालकांच्या कुटुंबास शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत तात्काळ मिळावी याकरीता चोपडा यावल मतदारसंघाचे आमदार प्रा . चंद्रकांत सोनवणे यांनी सातत्याने शासन दरबारी सर्वतोपरीने प्रयत्न करीत त्यांना आर्थिक मदत मिळून दिली .