यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
येथील नगर पालीकेच्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकी रणधुमाळी सुरू झाली असून,राजकीय वातावरण तापु लागले असुन,
यातच यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी त्यांच्या पत्नी व नगराध्यक्षपदाच्या सर्वाधीक चर्चेतील उमेदवार सौ छाया पाटील यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटात जाहीर प्रवेश घेतल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणुन त्यांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा देखील या वेळी करण्यात आली .
पाटील यांच्या कृषी केन्द्रावर आयोजीत महाविकास आघाडीच्या मेळाव्यास माजी आमदार रमेश चौधरी ,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले . शिवसेना उबाठाचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी, काँग्रेसचे हाजी शब्बीर खान
Yavalnews /तालुकाप्रमुख शरद कोळी , माजी शिवसेना तालुका प्रमुख कडू पाटील,काँग्रेसचे शहर अध्यक्ष हकीम शेख, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले,संतोष खर्चे,पप्पु जोशी, योगेश चौधरी यांच्यासह मोठया संख्येत महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . मेळाव्याचे सुत्रसंचलन शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले यांनी केले .







