ओ टी एस पी योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे वाटप करण्याकरता लाभार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहान !

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

ओ टी एस पी योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचे गट ‘शेळी गट वाटप करणे करता अनुसूचित जाती गटातील लाभार्थ्यांनी या योजने करता अर्ज सादर करावे असे आवाहन सिंदखेडराजा पशुधन विस्तार अधिकारी श्री उदार तसेच साखरखेर्डा येथील पशुवैद्यकीय डॉक्टर श्री शिंगणे यांनी केली आहे ‘सन 2020-2021मध्ये ओ टी एस पी योजनेअंतर्गत75 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप करतात रुपये वीस लाख व शेळी गट वाटप करता रुपये दहा लाखाची तरतूद जिल्हा पशुसंवर्धन विभाग बुलढाणा यांच्याकडे प्राप्त झालेली आहे !तरी सदरहू दुधाळ जनावरे वाटप करण्याकरता सिनखेडराजा तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज पशुधन कार्यालय सिंदखेड राजा येथे सादर करावा !अर्ज करण्याची तारीख 1 फेब्रुवारी 20 21 पासूनअर्ज स्विकारण्याची सुरुवात होईल ।तर 28 फेब्रुवारी 2021 हे अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख असेल !लाभार्थ्यांनी अर्जासोबत खालील प्रकारचे कागदपत्रे जोडावी !
1 )आधार कार्डची सत्यप्रत २) दारिद्र रेषेखालील असल्याचा दाखला 3) सातबारा व आठ अ ग्रामपंचायत नमुना ) ४ )प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत ५ )जातीच्या दाखल्याची सत्यप्रत ६ ) बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र ७)रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डाची सत्यप्रत ८ )अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ९) बँक पासबुक ची सत्यप्रत १० )अपत्याचे प्रमाणपत्र ११ )
रेशन कार्डाची सत्यप्रत !
इत्यादी कागदपत्रे लाभार्थ्यांनी अर्जासोबत जोडायची आहे !

Leave a Comment