किनगांवराजा प्रभारी ठाणेदाराचे दुसरबिड मध्ये व्यापारी बैठकीत मार्गदर्शन

 

सिंदखेडराजा सुरेश हुसे

तालुक्यातील दुसरबीड गावामधे पोलीस स्टेशन किनगाव राजा चे प्रभारी ठाणेदार श्री रबडे साहेब यांनी दुसरबीड येथील सर्व व्यापारी मंडळी यांची आज रोजी मीटिंग घेउन खाली प्रमाणे सुचना केल्या दुसरबीड गावांमधील मधील सराफा व्यापारी असोसिएशन, इलेक्ट्रिकल व्यापारी , किराणा दुकानदार व कपडा व्यापारी, सराफा असोसिएशन यांची मीटिंग घेण्यात आलेली आहे.

सदरच्या मीटिंगमध्ये प्रत्येक आस्थापना/दुकान मध्ये सीसीटीव्ही लावून CCTV चे बॅकअप कमीत कमी 30 दिवसाचे असावेत, शक्यतोवर संपूर्ण व्यवहार हा ऑनलाइन करण्यात यावा, आस्थापना/दुकान बंद करते वेळी कोणतीही रक्कम दुकानात ठेवू नये, दुकान वेळेत बंद करावेत, एखादा अनोळखी व्यक्ती कधीतरी येऊन अधिक रकमेची खरेदी करीत असल्यास पोलीस स्टेशनला माहिती द्यावी,

रस्त्यावर आस्थापने समोर लागणारे वाहनामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये करीता आपले आस्थापने समोर वाचमन ठेवणे आवश्यक आहे, तसेच आगामी दसरा आणि दिवाळी सना निमित्त आपले सोने चांदीचे दागिने यांची काळजी घेणे,

सर्वांनी CCTV मध्ये पूर्ण एरिया कव्हर होईल अशा प्रकारे लावणे इतर महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत. मीटिंग करिता 15-20 लोक हजर होते.

Leave a Comment