सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
आपल्या शैक्षणिक , व सांस्कृतिक,आरोग्य सेवा, जनसेवेसाठी जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये परिचित असलेले मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रम भाविकासाठी कोरोना च्या पार्श्वभूमीवर विवेकानंद आश्रमाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आली आहे,मेहकर तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे,हिवरा आश्रम येथे आठवड्याभरात मध्ये कोरोना चे सहा रुग्ण आढळून आले आहे,याच पार्श्वभूमीवर शासनानेव प्रशासनाने कोरोना वर निर्बंध आणण्यासाठी नियम व अटी घालून दिलेली आहे,विवेकानंद आश्रम मध्ये परमपूज्य शुकदास महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक दाखल होत असतात .म्हणून खबरदारी म्हणून विवेकानंद आश्रमाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून भाविकांनी घरूनच समाधीचे दर्शन घ्यावे असे आवाहन यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे !



![check bounce case/धनादेश अनादर प्रकरणी एकास २ महिने शिक्षा व ८५ हजार रु.दंड. [ शेवटी फिर्यादी मयताचे वारसास अखेर न्याय मिळाला.]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/04/20260401_212526.jpg?resize=218%2C150&ssl=1)



