Home गोंदिया घरफोड्या करणार्‍या चोरांना तात्काळ पकडा : तिरोडा तालुका पत्रकार संघाचे पोलीस निरीक्षकांना...

घरफोड्या करणार्‍या चोरांना तात्काळ पकडा : तिरोडा तालुका पत्रकार संघाचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

252
0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

तिरोडा, दि.20 : शहरात चोर्‍या व घरफोड्यांचे प्रमाण वाढत आहे. 7 ते 15 दिवसांच्या दरम्यान चोर्‍या-घरफोड्या होत आहेत. त्यामुळे नागरिकांना सुरक्षाविषयक चिंता भेळसावत आहे. पोलीस प्रशासनाने आपली तपासचक्रे गतीने फिरवून रात्रीदरम्यान कुलूप तोडून घरफोडी करणार्‍या चोरांच्या टोळीला तात्काळ पकडावे व नागरिकांना भीतीमुक्त करावे, अशा मागणीचे निवेदन तिरोडा तालुका नोंदणीकृत पत्रकार संघाने पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांना दि. 19 डिसेंबर रोजी दिले आहे.
निवेदनानुसार, पत्रकार संघाचे सदस्य देवानंद शिवचरण शहारे रा. सैनिक कॉलनी, नेहरू वॉर्ड, तिरोडा यांच्या येथे 22 ते 23 नोव्हेंबर 2020 दरम्यान अज्ञात चोरांनी घरफोडी करून लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रकमेवर हात साफ केले. या प्रकरणाला आता जवळपास महिनाभराचा कालावधी होत असून चोरटे अद्याप मोकळे आहेत. पोलिसांनी तपासकार्यात गती आणून चोरांना अटक करावे. तसेच पोलीस ठाण्यात मागील काही घरफोड्यांचे तपासकार्य सुद्धा ‘जैसे थे’ स्थितीमध्ये आहे. चोरांना अद्याप पकडण्यात न आल्याने तथा चोरांची टोळी मोकाट असल्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे.

देवानंद शहारे यांच्या घरी झालेली घरफोडी व इतर घरफोड्यांचा तपास तात्काळ लावण्यात यावा तथा नागरिकांना भीतीमुक्त जीवन जगण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून यथायोग्य सहकार्य व्हावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हुपराज जमईवर, उपाध्यक्ष राधेश्याम नागपुरे, सचिव विजय खोब्रागडे, लक्ष्मीनारायण दुबे, नितिन आगाशे, मुकेश अग्रवाल, मुरलीदास गोंडाणे, सुरेन्द्र भांडारकर, स्वप्नील शहारे, नीलकंठ साकुरे, कमल कापसे, अतित डोंगरे, मनोहर नंदनवार, पंकज देहलीवाल, हितेंद्र जांभूळकर, हितेशकुमार रहांगडाले, सचिन ढबाले, अमरदीप बडगे, डॉ.संजय जगणे, मनीष नंदरधने, राजू चामट, अजय नंदागवळी, नरेशकुमार असाटी, प्रदीप शहारे आदि उपस्थित होते.

Previous article8 दारू अड्ड्यांवर धाड घालून 9.52 लाख
Next articleमातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील वीरपुत्र नायक प्रदीप मांदळे यांना हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप !चिमुकल्या जयदीप ने दिला पित्याच्या चितेला अग्नी !शहीद प्रदिप मांदळे अमर रहे’च्या घोषणेने परिसर दणाणला !अंत्यविधीला तरुणांची उपस्थिती लक्षणीय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here