चर्मकार समाजाच्या आठ वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात संग्रामपूर तहसीलदारांमार्फत राज्यपालांना राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चाचे निवेदन.

 

संग्रामपुर येथील तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय यांना राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की शिरशी ता. सोनपेठ जि. परभणी येथे दिनांक ४ऑक्टोंबर २०२३ रोजी ८ वर्षीय मुलीवर व पळशी ता.उमरखेड जि.या यवतमाळ येथे १० ऑक्टोंबर २०२३ रोजी ११ वर्षीय मुलीवर म्हणजेच या दोन्ही चर्मकार समाजाच्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला हे मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. महाराष्ट्रासह देशभरातील चर्मकार समाजामध्ये संतापाची लाट आहे.समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे.

पीडित परीवारांना न्याय मिळावा म्हणून खालील मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले आहे.

१) दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक करुन त्यांच्या सहकाऱ्यांना सुध्दा अटक करावे.

२) सर्व गुन्हेगारांवर ऍट्रॉसिटी अॅक्ट लावून त्यांना जमानत मिळू नये यासाठीच प्रयत्न करावा. आरोपी जामिनावर सुटल्यास पीडितांच्या जिवाला धोका आहे.

३) सदर खटले जलदगती न्यायालयात दाखल करुनआरोपींना कठोरात कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी. अत्याचार झाल्यावर तक्रार घेत नाही अशा अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात यावे अशा विवीध मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चा यांच्या वतीने देण्यात आले. पीडित कुटुंबांना न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र भर राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चाच्या माध्यमातुन चरणबद्ध आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी निवेदनावर राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चा चे तालुका प्रभारी मंगेश वानेरे, गोविंदा डाखोडे,विशाल बावस्कर, जयप्रकाश डाखोडे बहुजन मुक्ती पार्टीचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष सुजित बांगर,रामदास भारसाकडे अंकुश कोकाटे, नानाभाऊ तायडे, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे अरुणभाऊ मानखैर पाटील,जगदिश कोकाटे, अंकित भारसाकडे व कार्यकर्त्यांच्या सह्या ह्या निवेदनात आहेत.

Leave a Comment