जगातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका आणि समाज सुधरिका फातिमा शेख यांची 192 वी जयंती साजरी

 

अमीर प्रतिष्ठान ने गरजू आदिवासी विद्यार्थ्याना मदत देऊन सामाजिक उपक्रमातून केली जयंती साजरी

विक्की वानखेडे यावल

महिला शिक्षणाच्या अग्रदूत शिक्षणाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांद्या लावून स्त्री शिक्षणासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या त्यांच्या सहकारी आणि आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका आणि समाज सुधारक फातिमा शेख यांच्या 192व्या जयंती निमित्त अमीर प्रतिष्ठान संचलित अमीर,कला व वाणिज्य,महाविद्यालय किनगाव यांच्या माध्यमातून संस्थाध्यक्ष हाजी रमजान अमीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्याध्यक्ष संचालक श्री.सचिन तडवी यांनी.

अंत्यन्त दुर्गमभागातील सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रम शाळा वाघझिरा ता.यावल येथे ईयत्ता 12 वी च्या वर्गात प्रवेशीत असलेल्या गोरगरीब आदिवासी विधार्थ्यांना अपेक्षित संच वाटप कारण्यात आले या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे श्री.सचिन तडवी यांचे मित्र असलेल्या एक दलित बहुजन मातंग समाजातील व हाथाला मिळेल ते काम करून भटकंती करून आपल्या परिवाराची पोटाची खळगी भरणाऱ्या व दैनंदिन अशा प्रकारे आपला स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या हालाखिची परिस्थिती असलेल्या अशा.

अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्ती श्री.भिमा भाऊ चव्हाण यांच्या हस्ते अपेक्षित प्रश्न संच वाटप करून समाजा समोर एक नवा असा उल्लेखनिय आदर्श निर्माण करून दिला मागील कित्येक वर्षा पासुन सचिन तडवी आपल्या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने हा कार्यक्रम राबवला आहे कार्यक्रमात श्री.सचिन तडवी यांनी विद्यार्थ्यांना यशस्वीते विषयी व पुढील शैक्षणिक वाटचाली संदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन श्री,राठोड सर यांनी केले.

आणि आभार प्रदर्शन श्री.महाजन सर यांनी केले कार्यक्रमा प्रसंगी अमीर प्रतिष्ठान संचलित कला व वाणिज्य महविद्यालयाचे खजिनदार व संचालक अजित तडवी,रफिक तडवी,संचालक मंडळ व शिक्षण प्रेमी,पालक,शाळेचे विध्यार्थी,शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक,श्री.किशोर महाजन सर शिक्षक व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Leave a Comment