गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद पंचायत समितीच्या 5% शेष फंडातून फंडातून 48 दिव्यांगांना प्रत्येकी एक हजार रुपयाचा भारतीय स्टेट बँकेचा चेक दिनांक 23 सप्टेंबरला जळगाव जामोद येथील पंचायत समिती कार्यालया मधून देण्यात आला. दिव्यांग बांधवांना या कोरोना महामारी मध्ये आर्थिक पाठबळ म्हणून प्रत्येकाला एक हजार रुपयाच चेक पंचायत समिती प्रशासनाकडून मदत स्वरूप दिव्यांग बांधवांना देण्यात आला यावेळी चेक स्वरूपात मदत देताना यावेळी पंचायत समिती सभापती रंजनाताई ठाकरे पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, सदस्य रामेश्वर राऊत,नंदा धंदर,सिमाताई कापसे,एकनाथ वनारे,गिताताई बंडल,विमल कळसकर,तसेच जिल्हा परिषद सदस्य श्रीराम अवचार, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे तसेच पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.