Home बुलढाणा जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

332
0

 

7 डिसेंबर रोजी तालुकास्तरावर, तर 10 डिसेंबर रोजी जिल्हा स्तरावर आयोजन

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा. दि.26 : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2020 ते 2025 दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या सरपंच पदांचे आरक्षण 7 डिसेंबर 2020 रोजी तहसिल स्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार हे निश्चित करणार आहे.
तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रीयांकरीता व खुल्या प्रवर्गाअंतर्गत स्त्रीयांकरीता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 10 डिसेंबर रोजी स. 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी याबाबतची नोंद सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरीकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.
********

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयातर्फे संविधान दिन साजरा !
Next articleडॉ.आण्णा भाऊ साठे नगर येथील सभागृहाचे त्वरित शुभारंभ करावे. मुख्याधिकाऱ्यांची घेतली भेट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here