टिपु सुलतान जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद Tipu Sultan

 

इस्माईल शेख बुलढाणा. जि. प्र

शेगांव: शहिदे वतन हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रविवार 19 नोव्हेंबर रोजी आठवडी बाजारातील डॉ.असलम खान यांच्या शिफा क्लिनिक येथे आयोजित भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्थानिक आठवडी बाजार परिसरातील शहिद अ.हमीद चौक येथील डॉ. असलम खान यांच्या शिफा क्लिनिक येथे रविवारी सकाळी 11वा.या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

दुपारी दोन वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ.दाऊद देवाणी यांनी शंभर च्या वर नेत्र रुग्णांची मोफत नेत्र तपासणी केली.यावेळी डॉ.असलम खान हे ऊपस्थीत होते,नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर असलम शेख,शिफा क्लिनिक,रिलीफ मेडीकल अ.हमीद चौक आठवडी बाजार व देवाणी चष्मा घर ,सहारा आय क्लिनीक मेन रोड शेगांव यांचे सहकार्य लाभले tipusultan

Leave a Comment