ट्रक ने मजुराला चिरडले,चार ठार तर सहा मजूर जख्मी वडनेर भोलजी जवळची घटना

 

बुलढाणा: नागपूर मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज सकाळी भीषण अपघात घडला एका आयशर ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडले या अपघातामध्ये 4 मजूर जागीच ठार झाले. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर गावानजीक ही घटना घडली.

सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 05/30 वा. सुमारास रस्त्याच्या बाजूला खाली जमीनवर मजूर झोपलेले असतांना ट्रक क्र. PB-11- CZ-4074 चे चालक याने त्याचे ताब्यातील वाहन निष्काळजी पणे व भरधाव वेगाने चालवून झोपलेल्या मजुरांचे अंगावर नेल्यामुळे 1) प्रकाश मकु धांडेकर, अंवय 26 वर्ष, 2) पंकज तुळशीराम जांबेकर, अं. वय 19 वर्ष, 3) अभिषेक रमेश जांबेकर अंदाजे वय 18 वर्ष रा. मोरगड यांचे मरणास व ईतर मजुर लोकांना जखमी करण्यास कारणीभूत झाला व घटनास्थळी वाहन सोडून मदत न करता पळून गेला आहे.

याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment