तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने संविधान दिन साजरा..!

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

मेहकर येथे तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाटीकेमध्ये26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.सुभाष भाऊ बैलके हे होते,तर प्रमुख उपस्थिती म्हणून मेहकर येथील तथागत ग्रुप महाराष्ट्र सचिव मा.अनिल भाऊ देबाजे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष मा.अख्तर भाई कुरेशी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.वरील सर्व मान्यवरांची भारतीय संविधानावर समायोचित भाषणं केले व कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई व मान्यवरांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केले व छोटेखानी भाषणामध्ये सांगितले की,भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे “भारतीय संविधान” 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस,अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली, या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून 26 नोव्हेंबरला हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधानांचा विजय असो आदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
या प्रसंगी मा.कुणाल भाऊ माने, कैलास भाऊ दुगाने,प्रमोद अंभोरे,राजकुमार ऊचित,विजय सरकटे,विजय कंकाळ,सतिष शेटाणे,असलम भाई गवळी,समाधान पवार,सचिन बनचरे,रवी जोरावर पंकज जाधव,योगेश अवसरमोल,सुनिल गवई यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार मा.कपिल भाऊ इंगळे यांनी मानले.

Leave a Comment