पीएम किसान लाभार्थ्यांसाठी समस्या निराकरण शिबिराचे आयोजन

 

विकी वानखेडे यावल

शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान लाभार्थी समस्या निराकरण शिबिराचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यावेळी २२२ शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर उपस्थित होत्या

यावेळी यावल नायब तहसीलदार संतोष विनंते, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, संजय महाजन माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे चंद्रशेखर चौधरी, पप्पू चौधरी रवींद्र होले, नीलेश चौधरी, तलाठी तेजस पाटील, मंडळ अधिकारी एम.एच. तडवी, तलाठी हेमा सांगोळे, महसूल सहायक सुयोग पाटील, तलाठी स्मिता कोळी, कृषी सहायक डी.व्ही. कठोके, कृषी अधिकारी सागर शिनारे, तलाठी मिलिंद कुरकुरे उपस्थित होते

सुट्टीच्या दिवशी लॅपटॉप घेऊन कर्मचारी कामावर

● शिबिरामध्ये तीन ठिकाणी लॅपटॉप घेऊन , तलाठी मिलिंद कुरकुरे, स्नेहल फिरके शहरातील सेतू केंद्रातील बांधव आणि संजय राजपूत, ज्ञानेश्वर तायडे, तुषार जाधव यांनी कामकाज पाहिले..

तसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी शहरातील शेतकरी बांधवांची तांत्रिक अडचण दूर केली. या कार्यक्रमासाठी अंबिका दूध संस्थेचे संचालक पप्पू चौधरी यांनी परिश्रम घेतले.

पीएम किसान योजनेतील लाभार्थ्याशी चर्चा करताना तहसीलदार मोहनमाला नाझीरकर.

Leave a Comment