ब्युरो रिपोर्ट सूर्या मराठी न्यूज
बुलढाणा : बहुचर्चित नाबालिक मुलीच्या अपहरण प्रकरणात राज्य महिला आयोगाने हस्तक्षेप केल्यामुळे बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून कायद्याची पायमल्ली करणारी आता राज्य महिला आयोगाच्या रडारवर आहेत.
सदर प्रकरणाची राज्य महिला आयोगाने सविस्तर माहिती घेत चौकशी केली तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची लटकती तलवार राहनार आहे.
सदर प्रकरनात बुलढाणा जिल्ह्यातील मराठा समाजाचे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, अंबादास दानवे यांची भेट घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रा कडून प्राप्त होत आहे.
जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या एफआयआर क्रमांक 575/22 मध्ये राज्य महिला आयोगाकडून माहिती मांगवीत नियमानुसार कारवाई करण्याचे पत्र पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना लेखी पत्र आले आहे.
नाबालिक मुलीच्या अपहरण प्रकरणात आता राज्य महिला आयोगाचे पत्र बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आल्यामुळे सदर प्रकरणाला महिला आयोगाने गांभीर्याने घेतल्याचे निदर्शनास येत आहे.
सदर प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून उडवा उडवीची उत्तरे देणे,नाबालिक मुलीला मातापित्यापासून लांब ठेवणे, नाबालिक मुलीचे दबाव आणून बयान नोंदविणे, तपास अधिकारी घोडेस्वार यांची कायद्याची पायमल्ली करणे आता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अंगलट येणार आहे.
याबाबत पीडित मुलीचे माता पिता यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार नोंदवीत पोलीस प्रशासन माजी मंत्री आमदार संजय कुटे यांच्या दबावात काम करीत असून कायद्याची खुलेआम पायमल्ली करीत आहे. त्यामुळेच पिडीत माता पित्यानी हम करे सो कायदा वृत्तीला आव्हान देत तक्रार केली होती.
तर सदर प्रकरणात पीडित मुलीच्या माता पित्यांकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, आझाद हिंद शेतकरी संघटनेकडे न्यायाची मागणी सूध्दा केली होती. सदर प्रकरणात सुरुवातीपासून आझाद हिंद शेतकरी संघटनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच महिला सुरक्षित असल्यामुळे झोपडीबांधो आंदोलन करण्याची भूमिका पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी यापूर्वीच घेतली आहे.
त्यानुसार आज पीडित मातापित्यांना राज्य महिला आयोगाकडून दखल घेतल्याचा पत्राची सह प्रत प्राप्त झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
#Rupalichakankar
@rupalichakankar