Home Breaking News बोरगाव मंजू येथे दुचाकी व ट्रकच्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार,

बोरगाव मंजू येथे दुचाकी व ट्रकच्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार,

552
0

 

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

अकोला दि. 16 डिसेंबर :- बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महामार्ग क्रमांक 6 वरील बोरगाव मंजू येथील उज्वल स्कूल व आराम मशीन नजीक आज दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास घडलेल्या एका घटनेमध्ये एक अनोळखी दुचाकीस्वार अकोल्याकडे येत असताना अमरावती कडे खत भरून घेऊन जाणाऱ्या ट्रक समोर आल्याने जागीच ठार झाल्याचे वृत्त असून याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोरगाव मंजू येथे घडलेल्या दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास घडलेल्या एका भीषण अपघातामध्ये एक अनोळखी इसम दुचाकी क्रमांक MH 19 DC 6533 ने अकोल्याकडे येत असताना समोरून येणाऱ्या व अमरावतीकडे खताचे पोते भरून घेऊन जात असलेल्या ट्रक क्रमांक MH 40 BL 5263 हा मार्गस्थ असताना दुचाकीस्वार त्या ट्रकसमोर येवून त्याची दुचाकी ट्रक खाली आल्याने या अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके,यांनी पो.कॉ. शरद बुंदे,हे.कॉ.कानडे,हे.कॉ.संजय इंगळे च यांच्यासह घटनास्थळ गाठीत तात्काळ पंचनामा करण्यात येऊन अनोळखी इसमाच्या मृत्यूदेहास अकोला सर्वोपचार रुग्णालय येथे शवचिकित्से करिता पाठविण्यात आले असून पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

Previous articleसरपंच पदाच्या आजच्या सुधारित आदेशाने संभ्रम दूर
Next articleकचरा संकलन कंपन्यांवर आर्थिक दंड करा आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे सक्त निर्देश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here