महिलांनी सक्षम बनवून निर्भीड जगा, प्रमोद बोबडे तालुका व्यवस्थापक

 

इस्माईल शेख शेगाव शहर

शेगाव स्थानिक शेगाव येथील नगरपालिका टाऊन हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत ध्रुवतारा महिला प्रभाग यांची वार्षिक आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रभाग संघातील महिला समुहातील सीआरपी कृषीसखी मास्टर कृषी सखी समूहातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मागील तीन वर्षापासून स्थापन झालेल्या ध्रुवतारा प्रभाग संघातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलांचे जीवनमान उंचावलेले आहे.

महिला समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिलांनी छोटे-मोठे उद्योग सुरू करून आपली जीवन उपजीविका करत आहेत महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून सक्षम बनवून जगावे असे प्रतिपादन शेगाव तालुका व्यवस्थापक प्रमोद जी बोबडे सर यांनी केले.

यावेळी बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक अभियान व्यवस्थापक नितीन जी मेश्राम साहेब शेगाव गट विकास अधिकारी सतीशजी देशमुख साहेब शेगाव तहसीलदार समाधानजी सोनवणे साहेब जिल्हा गट बांधणी व्यवस्थापक श्री तरेकर साहेब वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भोजने तसेच शेगाव येथील समुह ब्लॉक मॅनेजर वंदना हिवाळे मॅडम दीपक गावंडे प्रशांत वैयतकार मॅडम दिव्या मॅडम हेरोडे आधी कर्मचारी उपस्थित होते

Leave a Comment