राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या घाटकोपर मुंबई विभागीय अध्यक्षपदी रत्ना अरुण पाटोळे

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या घाटकोपर मुंबई विभागीय अध्यक्षपदी घाटकोपर येथील समाजसेविका रत्ना अरुण पाटोळे यांची निवड करण्यात आली आहे

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या महानगरी मुंबई मधील रेल्वेतून दररोज हजारो महिला प्रवासी प्रवास करतात महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे संघटनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी व

मुंबई घाटकोपर परिसरात राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेचे कार्य वाढविण्याच्या उद्देशाने समाजसेविका रत्नाताई अरुण पाटोळे यांची घाटकोपर मुंबई विभागीय राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना अध्यक्षपदी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांनी निवड केली आहे रत्नाताई पाटोळे यांची निवड

झाल्याबद्दल रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

Leave a Comment