लय भारी साहित्य समूह आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त पहिले राज्यस्तरीय ऑनलाईन लेखी कवी संमेलन यशस्वीरित्या संपन्न

0
504

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त पहिले ऑनलाइन राज्यस्तरीय कवी संमेलन घेण्यात आले होते.

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर कवींनी लिहिलेल्या कवितांचे सादरीकरण करण्यासाठी टेज कार्यक्रम बंद असल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने काव्यसंमेलन घेण्यात येतात त्याच पद्धतीने लय भारी साहित्य समूह यांच्यावतीने ही प्रजासत्ताक दिनानिमित्त पहिली राज्यस्तरीय ऑनलाइन लेखी कवी संमेलन व्यवस्थित रित्या ऑनलाइन पद्धतीने पार पडले.

 

 

या पहिल्याच राज्यस्तरीय कवीसंमेलनाला सर्व कवी मित्रांकडुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व स्वरचित लिहिलेल्या कविता या प्रसिद्धी करण्यासाठी त्यांना संधी मिळाली त्यामुळे आनंदाई पद्धतीने हे ऑनलाईन लेखी काव्यसंमेलन संपन्न झाले.

 

या काव्य संमेलनाचे संचालक , अनिल शामराव केंगार सांगोला , संचालक प्रमोद सूर्यवंशी मुंबई , संचालिका सौ , किरणताई मोरे चव्हाण गोंदिया यांनी खूप नियोजनबद्द कार्यक्रमाचे आयोजन केले होते. , व या कवीसंमेलनाला श्री. संतोष बाजीराव रायबान मंगळवेढा , यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले . व सर्व कवींच्या कवितांना दाद देत त्यांच्या कवितांचे परीक्षण करून सहभागी कवींचे नंबर काढून त्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र देऊन सर्वांचे अभिनंदन केले.

 

 

शब्दांचे धारदार वार
थेट काळजात भिडले
गोडी लागली कवितेची
आणि मन कवितात रमले

सर्व क्रमांक पुढील प्रमाणे काढले आहेत. सर्वोत्कृष्ट – सौ , वैभवी मराठे , उत्कृष्ट – प्रा . सौ , कल्पना निंबोकार अंबुलकर , प्रथम – शुभांगी देशमुख , द्वितीय – हरिदास गौतम , तृतीय – चित्तरंजन महादेव भगत , उत्तेजनार्थ – पी . जी . ठाकूर , राकेश प्रभावती बुधाजी डाफळे , संगीता महाजन ,

सहभागी – वसंत गवळी , सुमित राठोड , पंकज रा कासार काटकर , संजय बुऱ्हाडे , बबिता तोरणे , गणेश मगर , अमीर पटेल , रत्ना मनवरे , संध्या देशपांडे , बालाजी नाईकवाडी , सुरेश वडर , विद्या शरद श्रॉफ , मधुकर गायकवाड , रुकसाना मुल्ला , उषा चौधरी सातपुते , अमित अनंत कडव , मीनाक्षी परशुराम काळेले , अथर्वा मनचेकर , अस्मिता सावंत , रेखा बावा , मंदाताई वाघमारे , शशिकला गुंजाळ ह्या सर्व कवी / कवयित्री यांनी कार्यक्रमाची आपल्या काव्यातून शोभा वाढवली.

१३ जानेवारी ते २३ जानेवारी पर्यन्त चालनारी ही काव्यमय श्रखंला आनंदमय प्रेमाने आणि शांततापणे पार पडली. आणि
सगळ्या कविता बहरदार असल्याने आनंद गगनात मावत नव्हता .

 

कामात सगळे व्यस्त होऊन सुद्धा ही काव्य स्पर्धा पार पडली.
मला माझ्या लयभारी साहित्य समूहाचा अभिमान आहे. असे सांगत कार्यक्रमाच्या मान्यवरांनी सर्व कवींना
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here